Posts

वयाच्या 30 व्या वर्षी करिअर बदलण्यापूर्वी विचारात घेणाऱ्या आवश्यक गोष्टी

Image
          आपण सर्व १० वी च्या वर्गात आल्यावर ठरवतो कि आपण कशात आपलं करिअर करायच.  मुलं साठी नेहमीच त्यांचे पालक  ठरवतात  कि ती पुढे जाऊन कशात करिअर करणार आहेत.  १० वी च्या मार्कांवर ठरत कि आर्टस् घेणार  कि कॉमर्स का science.  मुले हि आपल्या पालकांवर विश्वास ठेऊन पुढे आलेल्या मार्गावर चालत राहतात. पण इथे एक गोष्ट आपण विसरून जातो ते म्हणजे का आपण या profession मध्ये आहोत.  अशावेळी बऱ्याच प्रयद्यांनी नंतर आपल्या लक्ष्यात येत कि हे नाही माझं क्षेत्र नाही आणि आता वेळ आली आहे कि मला जे करायचं ते मी करणार.                वयाच्या ३० व्या वर्षी जर तुम्ही करिअर बदलण्याचा विचार करत असाल  तर काही गोष्टी आपण लक्ष्यात घेतल्या पाहिजेत.  तुम्हाला असे वाटत कि आपल्याला खूप उशीर तर नाही झाला ना?, मी माझ्या हातातील संधी चुकवली तर नाही ना?, माझ्या आजूबाजूच्या लोक काय म्हणतील ?, लोक कसं काय ३० व्या वर्षी करिअर बदलतात त्यांना भीती नाही वाटत का? बरेच प्रश्न आपल्या समोर आ वासून उभे राहतात...

वयाच्या ३० नंतर करिअर बदल्याची ५ महत्वाची कारणे

Image
       करिअर हा आपल्या आयुष्यातला खूप मोठा आणि महत्वाचा भाग आहे. आपण सर्व एक मूलभूत औपचारिक शिक्षण घेत आलो आहोत (आपले आई बाबा हि ).  नेहमी एक साचेबद्ध आयुष्य जगण्याचे ध्येय आपण मनाशी बाळगून आपण आपल्या  आयुष्याची  वाटचाल करत आलो आहोत. आपण जर मानवाच्या  उत्क्रांती  चा काळ लक्ष्यात घेतला तर असं बघायला मिळेल कि परिस्थिनुसार बदल करणारा प्रत्येक जीव हा  चार्ल्स  डार्विन च्या "Survival of fittest" ह्या संज्ञानुसार  आपलं आयुष्य घडवत असतो. प्रश्न हा आहे कि आयुष्य साचेबद्ध पद्धतीने जगण्यासाठी आपल्याला मिळालं आहे का? वयाच्या ३० नंतर जर कोणाला करिअर बदलाचे असेल तर त्याने करू नये का? आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टी  फक्त हा समाज काय म्हणेल ह्या एका कारणासाठी सोडून द्याच्या का? आजच्या ब्लॉग मध्ये आपण बघूया कि लोकांना वयाच्या तिशी नंतर करिअर बदल करावा असं का वाटत असेल.            बऱ्याचवेळा आपण बघितलं असेल कि पालक आपल्या पाल्याला त्यांच्या आवडीनुसार करिअर निवडण्यासाठी भाग पाडतात. पाल्याना हि त्यांच्य...