वयाच्या ३० नंतर करिअर बदल्याची ५ महत्वाची कारणे

     करिअर हा आपल्या आयुष्यातला खूप मोठा आणि महत्वाचा भाग आहे. आपण सर्व एक मूलभूत औपचारिक शिक्षण घेत आलो आहोत (आपले आई बाबा हि ).  नेहमी एक साचेबद्ध आयुष्य जगण्याचे ध्येय आपण मनाशी बाळगून आपण आपल्या  आयुष्याची  वाटचाल करत आलो आहोत. आपण जर मानवाच्या  उत्क्रांती  चा काळ लक्ष्यात घेतला तर असं बघायला मिळेल कि परिस्थिनुसार बदल करणारा प्रत्येक जीव हा  चार्ल्स  डार्विन च्या "Survival of fittest" ह्या संज्ञानुसार  आपलं आयुष्य घडवत असतो. प्रश्न हा आहे कि आयुष्य साचेबद्ध पद्धतीने जगण्यासाठी आपल्याला मिळालं आहे का? वयाच्या ३० नंतर जर कोणाला करिअर बदलाचे असेल तर त्याने करू नये का? आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टी  फक्त हा समाज काय म्हणेल ह्या एका कारणासाठी सोडून द्याच्या का? आजच्या ब्लॉग मध्ये आपण बघूया कि लोकांना वयाच्या तिशी नंतर करिअर बदल करावा असं का वाटत असेल. 



        बऱ्याचवेळा आपण बघितलं असेल कि पालक आपल्या पाल्याला त्यांच्या आवडीनुसार करिअर निवडण्यासाठी भाग पाडतात. पाल्याना हि त्यांच्या आवडी  नुसार काय करावं हे माहित नसत किंवा त्यांच्या जवळ पुरेशी माहिती उपलब्ध नसते. कधी असा हि होत कि आपण एका कंपनी मध्ये खूप चांगलं काम करतोय पण कंपनीच  बंद पडली. खूप जवळच उदाहरण बघायचं झालं तर आता जी परिस्थिती उद्भवली आहे ती "CORONA - PANDEMIC ". आयुष्य हे कधीच साधं सरळ नसत कोणाच्याच्या च बाबतीत. असं म्हणतात जशी लाट येईल तस माणसाने पोहायला शिकले पाहिजे. २० व्या वर्ष पर्यंत आपल्याला वाटतं राहत कि आपण आपल्या ध्येयाच्या च्या दिशेनं चालतोय पण आयुष्यात एक turning point येतो आणि ३० पर्यंत येता येता आपली स्वप्न बदलत जातात. आपल्या आपल्या काम मध्ये "Inner  peace"  नाही मिळत. आणि ह्यात तुम्ही एकटे नाही, अशी बरीच लोक आहेत ज्यांना ३० नंतर आपलं करिअर बदलायचं असत. आपण आज या ब्लॉग मध्ये जाणून घेऊया कि कोणती महत्तवाची करणे आहेत ज्यामुळे तिशी नंतर लोक करिअर चांगले करण्याचा मार्ग निवडतायत. 



  1. नोकरीसाठी उत्कटतेची कमतरता :- सरासरी प्रत्येक व्यक्ती ही वयाच्या ६० व्या वर्ष पर्यंत काम करते. तुम्ही आता जे काम करताय त्यामध्ये जर तुम्हाला आनंद आणि समाधान नसेल मिळत तर अजून पुढची ३० वर्ष तुम्ही असेच मन मारून काम करत राहाल. कोणताही काम हे आवडीने आणि आनंदाने करावं तरच ते केल्याचं समाधान आपल्याला मिळत नाहीतर आयुष्यभर फक्त पगार मिळतोय म्हणू काम करू नये. जे काही काम करत असाल त्यात नाव नवीन शोध लावत जा आणि स्वतःची एक growth निर्माण करा.
  2.  करिअरच्या  वाढीची  किमान  शक्यता :- प्रत्येकाला वाटत असते कि करिअर च्या एका टप्प्यात आपल्यावर आपल्याला अजून मोठी करिअर ची शिखरे पार करता यावीत. प्रत्येक कामाच्या ठिकाणी तुम्हाला अशी शिखरे मिळतील कि नाही याची शाश्वती नाही. ज्याठिकाणी तुम्हाला असं वाटत कि तुम्ही अजून काही चांगले काम करू शकता तर नक्कीच तुमच्या करिअर मध्ये तिथे तुम्ही नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन पुढील वाटचाल सुरु ठेवावी. कोणालाही अश्या ठिकाणी काम नाही करू वाटणार जिथे करिअर मध्ये पुढे जाण्यासाठी खूप कमी संधी उपलब्ध असतील. 
  3. कामाचे व्यवस्थापन आणि त्रासदायक कामाचे त्रास :-  आपण प्रत्येकजण कामाचे नियोजन व्यवस्थित करत असतो. तरीही प्रत्येक काम पूर्ण करण्यासाठी आपल्याजवळ वेळ नाही पुरत. हे होण्यामागचं कारण एकाच आहे ते म्हणजे आपण आपल्या आवडीचं काम नाही करत आहोत. ज्यावेळी तुम्ही तुमच्या आवडीचं काम करायला सुरवात करायला त्यावेळी तुम्हाला वेळेची फिकीर नाही राहणार. हे एक कारण नक्कीच आहे तिशी नंतर करिअर बदलण्याचं करण्याचं.
  4. काम आणि जीवनाचा ताळमेळ :-  सध्यच्या परिस्तिथीशी जर तुलना केली तर ५ वर्षांपूर्वी तुमची जी परिस्तिथी होती ती आजच्या मानाने कमी त्रास देणारी होती. आता कदाचित तुमचे आई बाबा त्यांच्या वार्ध्यक्याच्या दिशेने प्रवास करात असतील आणि कदाचित  तुमचं  स्वतःचा परिवारीवारीक आयुष्य चालू झाले असेल. अशा परिस्थिती मध्ये करिअर बदलणे हा  नक्कीच तुमच्यासाठी आणीबाणी चा प्रश्न असेल. जास्त तणावपूर्ण परिस्थिती मध्ये काम करणार्यां मध्ये कोरोनरी रोग जसे कि टाइप 2 मधुमेह आणि उच्च कोलेस्ट्रॉलचा त्रास संभवतो आणि तुमचं आरोग्य हे सर्व गोष्टींच्या आधी येत. त्याला प्राधान्यक्रम द्यायला आपल्याला शिकल पाहिजे. त्यासाठी तुम्ही करिअर बदलण्याचं निर्णय घेत असाल तर तो नक्कीच तुमच्या पुढील आयुष्यासाठी चांगला असणार आहे. 
  5. तुम्ही Autopilot mode वर आहात का? :- काही करिअर असे असतात कि ज्यामध्ये आपण आपल्या routine मध्ये रमून जातो. एका संशोधनानुसार असं लक्षात आलं कि  प्रौढ लोक दिवसातून सुमारे 35,000 निर्णय घेतात. बर्‍याच वेळा असे होते की आपण विचार न करता गोष्टी करतो. यालाच Autopilot mode असं म्हणतात. ह्यात सर्वात मोठी अडचण अशी आहे कि आपण आपल्या सर्वांगीण  विकासाला गमवून बसतो. हे एक महत्वाचं कारण आहे करिअर बदलण्याचं पण खूप कमी लोक ह्याबाबतीत ठोस निर्णय घेऊ घेतात. 
        करिअर बदलताना खूप गोष्टी लक्ष्यात घेणे गरजेचे असते. त्यापैकी एक म्हणजे पूर्ण वेळ आपल्या आवडीच्या कामाचे प्रशिक्षण घेणे हे काहींना आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसते. करिअर बदलताना ज्या करिअर मध्ये तुम्हाला आवड आहे त्याचे online courses तुम्ही करू शकता.  
        ह्या ब्लॉग मध्ये आपण ३० नंतर लोकांना करिअर बदलण्याची गरज का वाटते ह्याची  कारण बघितली. पुढील ब्लॉग मध्ये बघूया कि जर करिअर बदलायचे असेल  तर कोणत्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. 
ब्लॉग पूर्ण बचल्याबद्दल धन्यवाद.  

Comments

Popular posts from this blog

वयाच्या 30 व्या वर्षी करिअर बदलण्यापूर्वी विचारात घेणाऱ्या आवश्यक गोष्टी