वयाच्या 30 व्या वर्षी करिअर बदलण्यापूर्वी विचारात घेणाऱ्या आवश्यक गोष्टी
आपण सर्व १० वी च्या वर्गात आल्यावर ठरवतो कि आपण कशात आपलं करिअर करायच. मुलं साठी नेहमीच त्यांचे पालक ठरवतात कि ती पुढे जाऊन कशात करिअर करणार आहेत. १० वी च्या मार्कांवर ठरत कि आर्टस् घेणार कि कॉमर्स का science. मुले हि आपल्या पालकांवर विश्वास ठेऊन पुढे आलेल्या मार्गावर चालत राहतात. पण इथे एक गोष्ट आपण विसरून जातो ते म्हणजे का आपण या profession मध्ये आहोत. अशावेळी बऱ्याच प्रयद्यांनी नंतर आपल्या लक्ष्यात येत कि हे नाही माझं क्षेत्र नाही आणि आता वेळ आली आहे कि मला जे करायचं ते मी करणार. वयाच्या ३० व्या वर्षी जर तुम्ही करिअर बदलण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी आपण लक्ष्यात घेतल्या पाहिजेत. तुम्हाला असे वाटत कि आपल्याला खूप उशीर तर नाही झाला ना?, मी माझ्या हातातील संधी चुकवली तर नाही ना?, माझ्या आजूबाजूच्या लोक काय म्हणतील ?, लोक कसं काय ३० व्या वर्षी करिअर बदलतात त्यांना भीती नाही वाटत का? बरेच प्रश्न आपल्या समोर आ वासून उभे राहतात...