वयाच्या 30 व्या वर्षी करिअर बदलण्यापूर्वी विचारात घेणाऱ्या आवश्यक गोष्टी
आपण सर्व १० वी च्या वर्गात आल्यावर ठरवतो कि आपण कशात आपलं करिअर करायच. मुलं साठी नेहमीच त्यांचे पालक ठरवतात कि ती पुढे जाऊन कशात करिअर करणार आहेत. १० वी च्या मार्कांवर ठरत कि आर्टस् घेणार कि कॉमर्स का science. मुले हि आपल्या पालकांवर विश्वास ठेऊन पुढे आलेल्या मार्गावर चालत राहतात. पण इथे एक गोष्ट आपण विसरून जातो ते म्हणजे का आपण या profession मध्ये आहोत. अशावेळी बऱ्याच प्रयद्यांनी नंतर आपल्या लक्ष्यात येत कि हे नाही माझं क्षेत्र नाही आणि आता वेळ आली आहे कि मला जे करायचं ते मी करणार.
वयाच्या ३० व्या वर्षी जर तुम्ही करिअर बदलण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी आपण लक्ष्यात घेतल्या पाहिजेत. तुम्हाला असे वाटत कि आपल्याला खूप उशीर तर नाही झाला ना?, मी माझ्या हातातील संधी चुकवली तर नाही ना?, माझ्या आजूबाजूच्या लोक काय म्हणतील ?, लोक कसं काय ३० व्या वर्षी करिअर बदलतात त्यांना भीती नाही वाटत का? बरेच प्रश्न आपल्या समोर आ वासून उभे राहतात. आजच्या ब्लॉग मध्ये आपण बघूया कि ३० व्या वर्षी जॉब change करताना कोणत्या गोष्टी लक्ष्यात घ्यायला पाहिजेत.
तुम्ही हि stage पूर्ण केल्यावर, तुमच्याकडे तुम्हाला योग्य असणाऱ्या सगळ्या profession ची लिस्ट मिळून जाईल. तुमच्या जवळ आता जी लिस्ट तयार आहे तिचा अभ्यास करायला सुरवात करा. तुम्ही एका अशा वळणावर येउन उभे राहाल जिथे तुम्हाला clarity मिळेल कि कोणत्या ठिकाणी आपल्याला करिअर करायचं आहे. त्या करिअर संबंधात सर्व माहिती मिळवण्याचा प्रयज्ञ करा. त्या नोकरीची कर्तव्य, उद्दीष्टे , मानधन आणि शैक्षणिक - प्रशिक्षण ची किती गरज आहे हे बघणं खूप महत्त्वाचे आहे. सगळ्या बाजूने विचार करून योग्य तो निर्णय घेणे कधीही सोयीचे ठरते .
काही महत्वाचे मुद्धे :-
तुम्ही आता तयार आहात करिअर बदलण्यासाठी तर बघूया कोणत्या गोष्टींवर आपण फोकस केला पाहिजे.
बी प्रॅक्टिकल (व्यावहारिक असणे) :-
तुम्ही जेव्हा नवीन करिअर मध्ये आपला वेळ गुंतवण्याचा विचार करता त्यावेळी एक गोष्ट खूप महत्वाची आहे ती म्हणजे जे करिअर आपण निवडत आहोत त्या मध्ये आपल्याला किती ज्ञान आहे आणि नसेल तर ते मिळवायला आपण काय करायला पाहिजे. व्यावहारिक असण्याची चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती हवं कि तुम्ही अंधारात नाही चालत आहात. तुमचा रस्ता तुमच्या समोर क्लिअर दिसत आहे. कधी कधी असं होत कि आपण प्रॅक्टिकल बघायचं सोडून कल्पनाशक्ती मध्ये रममाण होऊन जातो. असं न करता आपल्याला जिथे करिअर करायला आवडेल त्या व्यवसायातल्या लोकांना भेटून त्यांच्याकडून जमेल तेवढी माहिती गोळा करा आणि मग तुमचा रस्ता स्वतः तयार करा.
दृश्यावलोकन (व्हिज्युअलायझेशन):-
तुम्हाला ज्या करिअर मध्ये जायचं आहे त्याचे एक मानसिक चित्र तयार करा. त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची यादी तयार करा. सर्व यादी लिहून झाली कि कामांची विभागणी छोट्या छोट्या टास्क मध्ये करा आणि दृश्यावलोकन करायला सुरवात करा कि तुम्ही आता एक एक टास्क पूर्ण करत आहेत. प्रत्येक टास्क स्वतःहून पूर्ण केल्याचा आनंद घ्यायला सुरवात करा. तुम्हाला लगेच सर्व काही मिळवता येणार नाही पण तुम्ही रोज प्रयज्ञ चालू ठेवा. हे करण्याचा उद्दिष्ट असा आहे कि तुम्हाला तुमचा मेंदू गोष्टी सत्यात उतरवायला तुम्हाला मदत करत असतो.
संशोधन :-
नवीन करिअर निवडताना एक गोष्ट लक्ष्यात ठेवा कि तुम्हाला average नाही राहायचं, जे काही निवडाल स्वतःसाठी त्यामध्ये निपुण होण्याचा प्रयज्ञ करा. मार्केट मध्ये त्या निवडक करिअर ची व्याप्ती किती आहे हे शोधा आणि कामाला लागा . आपल्या भविष्यातील करियर उद्योगात उपलब्ध असलेल्या नोकर्या शोधा. तुम्ही जिथे नवीन करिअर सुरु करणार आहात त्याबद्दल संशोधन करणे खूप गरजेचं आहे. ह्या करिअर मुळे ,मला काय मिळणार आहे आणि मी कुठे पोचणार आहे हे नक्की करणं खूप आवश्यक आहे.
पगाराबाबत लवचिक रहा. नवीन करिअर फील्ड सुरू करणे म्हणजे सहसा एन्ट्री-लेव्हल पगार.
छोटी पावले उचला. तुम्हाला तुमच्या नवीन करिअर मध्ये दूरदृष्टी असणे महत्त्वाचे आहे. तुम्ही महाविद्यालयीन प्रशिक्षकाशी याविषयी चौकशी करू शकता.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यावर तुम्ही जेव्हा पहिली नोकरी स्वीकारली त्यावेळी तुम्हाला बऱ्याच गोष्टींची clarity नव्हती आणि ते पूर्णपणे ठीक आहे! कारण आत्ताच आपली संधी आहे,जिथे आहेत तिथून परत सुरवात करण्याची. ३० व्या वर्षी तुम्हाला एक चांगली clarity मिळालेली असते. तुमच्या strength आणि weakness याबद्दल तुमचं एक ठाम मत बनलेलं असत. आणि आपल्याला हातात करिअर ची स्वप्ने सत्यात आणण्याची संधी आहे.

खूपच छान ब्लॉग लिहिला आहे माधवी.तुझे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. भरपूर वाचन,माहिती संकलन केले आहेस. Hats off. असेच लिखाण चालू ठेव.
ReplyDelete